डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव

एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील  यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस  करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्ध  वंदना घेण्यात आली.  त्यानंतर महाविद्यालयातील रासेयो सल्लागार समिती सदस्य व पाली विभाग प्रमुख डॉ. सुभाष आठवले यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खानदेशातील कार्याची ओळख’ या विषयावर व्याख्यान झाले. यात त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या खानदेशातील कार्याचा रोमहर्षक इतिहास अतिशय ओघवत्या भाषेत विशद केला.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ सुरेंद्र कांबळे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा नाजीर पठाणमहिला अधिकारी प्रा मंजुळा साळवे यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील , उपप्राचार्य प्रा. पी. जी. पारधी, उपप्राचार्य डॉ. फुला बागुल, उपप्राचार्य प्रा. एस. टी. ठाकरे,  डॉ. सी एम पावरारासेयो विभागीय समन्वयक डॉ एन एस डोंगरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेंद्र कांबळे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा नाजीर पठाण, डॉ महेंद्र पाटील , श्री एस एन निकम भाऊसाहेब, श्री बोरसे भाऊसाहेब, श्री शिवाजी पाटील यांच्यासह प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर वर्ग आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेबद्दल कुलसचिव मा. रोहित रंधे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील , उपप्राचार्य प्रा. पी. जी. पारधी, उपप्राचार्य डॉ. फुला बागुल, उपप्राचार्य प्रा. एस. टी. ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.




Popular posts from this blog

शहीद दिवस साजरा

Ancient Khandesh