Posts

Showing posts from March, 2022

शहीद दिवस साजरा

Image
शहिद दिवस साजरा येथील  एस. पी. डी. एम. महाविद्यालयातील  रासेयो विभागाच्या वतीने शहिद दिवस कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी १००० पावले चालणे  अशी वाकथान  आयोजित करण्यात आली. त्यात रासेयो स्वयंसेवक व प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधूभगिनींनी  सहभाग घेतला. त्यानंतर महाविद्यालयात शहिद दिवसानिमित्त प्रा. वंदना सोनवणे  यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या व्याख्यानात त्यांनी ‘आजादी का अमृत महोत्सव आणि शहीद दिवस’ यावर व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात त्यांनी शहीदांच्या बलिदानाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंजुळा साळवे यांनी केले तर आभार डॉ. सुरेंद्र कांबळे यांनी मानले.   कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ सुरेंद्र कांबळे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा नाजीर पठाण,  महिला अधिकारी प्रा मंजुळा साळवे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील , उपप्राचार्य प्रा. पी. जी. पारधी, उपप्राचार्य डॉ. फुला बागूल,उपप्राचार्य प्रा. एस. टी. ठाकरे, प्रा.एम बी वाघ,  प्रा. एस एस वसावे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेंद्र कांबळे, सहायक